Menu

Sukanya Events

Your Partner In Happy Moments.......

डोहाळजेवण करताय ? मग हे जरूर वाचा !

डोहाळजेवण करताय ? मग हे जरूर वाचा !

डोहाळ जेवण

माझ्या माहितीप्रमाणे गर्भवति स्त्रीला दौरुधिनि म्हणजे दोन ह्रुदये असलेली असे म्हणतात, त्यावरूनच डोहाळे हा शब्द रुढ झाला.  सातव्या किंवा नवव्या महिन्यामध्ये हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. डोहाळे जेवणाला काही ठिकाणी ओट भरणी किंवा चोर ओटी भरणे असं म्हटलं जातं. या महिन्यात बाळचे टेस्ट बड्स तयार होत असतात  त्यामुळे बाळाला नवीन नविन चवी आवडु लागतात आणि त्या चवीचे पदार्थ खाण्याची इच्छा आईला होतात अस म्हणतात.

हा कार्यक्रम सन्ध्याकाळी व सुर्यास्ताच्या आधी करतात. जिचे डोहाळजेवण आहे तिला हिरव्या रंगाची साडी/ड्रेस भेट म्हणून देतात (नव्-निर्मितिचा रंग हिरवा असतो म्हणून). हल्ली इतरही भेटवस्तू दिल्या जातात, उद. गर्भसंस्कार व. पुस्तके इ.

ओटी ५ प्रकारच्या फळांनी भरणे. फक्त सासूबाईंनी ओटी भरायची, इतर स्त्रियांनी ५ फळे हाती लावणे.

जेवणासाठी पंचपक्वान्ने - जिचे डोहाळजेवण आहे तिच्या आवडीची करावीत. यात गंमत म्हणून एक स्त्रिलिन्गी व एक पुल्लिन्गी पक्वान्न असावे. उदा. खीर व लाडू. अशा २ पदार्थांवर पुरी झाकून तिला एक पसंत करावयास सांगणे व त्यानुसार मुलगा/मुलगी हे ठरवतात.

फुलांची/चांदण्याची वाडी भरणे या गोष्टी ऐच्छिक व प्रत्येक घराण्याप्रमाणे वेगळ्या असू शकतात.

डोहाळे जेवण आपल्याकडे का ठेवतात ?

डोहाळजेवण हा गर्भसंस्कार आहे. गरोदरपणात आपण जे वागतो ,वाचतो, खातो ,पितो या सगळ्याचा परिणाम आपल्या वाढणाऱ्या गर्भावर होतो त्यामुळे गर्भसंस्कार खरेच खूप महत्वाचे आहे.

डोहाळे जेवण सजावट